आधी मुख्यमंत्री आणि  गिरिश बापटांनी मका खावा

आधी मुख्यमंत्री आणि  गिरिश बापटांनी मका खावा
अजित पवार

सांगली: रेशनवर शेतकऱ्यांना मका खायला देणाऱ्या मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी पहिल्यांदा मका खावा आणि मग माझ्या शेतकऱ्यांना मका खायला द्यावा असे सांगतानाच नको तो प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जत येथील हल्लाबोल जाहीर सभेत सरकारला दिला.

माझा राज्यातील शेतकरी भोळाभाबडा आहे,तात्काळ विश्वास ठेवतो.सरकारने कर्जमाफी देतो सांगितले आणि माझ्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. मात्र या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.एकीकडे मते मागताना शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दयायची आणि दुसरीकडे सोयीस्करपणे सगळं विसरुन जायचं हे असलं कसलं सरकार असा सवाल दादांनी केला. आज शिपाई पदासाठी इंजिनिअर,एमबीए पदव्या घेतलेले तरुण अर्ज करत आहेत इतकी बेरोजगारी वाढली आहे.इतक्या मोठया पदव्या घेतलेल्या तरुणांनी शिपाई पदासाठी अर्ज करु लागले की,दहावी-बारावीच्या विदयार्थ्यांनी करायचं काय असा प्रश्नही दादांनी उपस्थित केला.येणारी लोकसभा-विधानसभा निवडणूक आपल्याला महत्वाची आहे.सोबत कोण राहतील,कोण जातील याचा विचार करु नका.आपापसातील वाद बाजुला ठेवा आणि पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

 

Previous articleमहाराष्ट्रात चार वर्षात १ लाख ४३ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प
Next articleतुम्ही तर छिंदमची अवलाद आहात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here