अजित पवार….भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत !

अजित पवार….भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत !

मुंबई : भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त बीकेसीच्या मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या महामेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार….भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असा थेट इशारा दिला.

भाजपाने बीकेसीच्या मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या महामेळाव्याला भाजपाध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी नेते आमदार खासदार उपस्थित आहेत. या महामेळाव्यात महसूलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात मित्र पक्ष शिवसेनेची बाजू घेत अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लोबोल यात्रा काढणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला असून, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असे म्हणत पाटलांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

Previous articleभाजपच्या जाहिरातीत एकनाथ खडसेंना पाचवे स्थान
Next articleउंदीर मंत्रालयात नाही विरोधकांच्या डोक्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here