२०१९ ची लोकसभा भाजपच जिंकणार

२०१९ ची लोकसभा भाजपच जिंकणार

मुंबई : केंद्रात आणि देशातील २२ राज्यांमध्ये, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता असून, भाजपाचे विराट स्वरुप आज आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

बीकेसीतील भाजपच्या महामेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसच्या सरकारने १ हजार २०० कोटी खर्च केले मात्र सिंचन फक्त १ टक्के झाले.केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. पीक विम्यासंबंधी महत्वाचे निर्णय घेतले. काँग्रेसच्या राजवटीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच शेतकऱ्याला मदत देण्यात येत होती मोदींनी ती ३३ टक्क्यांवर आणली असे दानवे म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना यशस्वी करुन दाखवली असे सांगतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता आणण्याचे ध्येय आहे असे दानवे म्हणाले.

Previous articleउंदीर मंत्रालयात नाही विरोधकांच्या डोक्यात
Next articleपवारसाहेब… चहावाल्याच्या नादी लागू नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here