कणकवलीत खा.नारायण राणेंचे वर्चस्व
कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह १७ पैकी ११ जागांसह
नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला आहे. भाजपा शिवसेना युतीला केवळ ६ जागाच जिंकता आल्या.
भाजपा आणि शिवसेनेने कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी युती केल्याने महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांच्यासाठी हि निवडणेक प्रतिष्ठेची ठरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकत राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली आहे. कणकवलीत नगराध्यक्षपदाची निवडणूक मात्र चुरशीची झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.युतीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समीर नलावडे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. मात्र नलावडे यांनी अवघ्या ३७ मतांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारत युतीच्या पारकरांना धक्का दिला. १७ जांगापैकी स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. स्वाभिमान-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने एकूण ११ जागा मिळाल्या. तर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी ३ जागांवरच विजय मिळवता आला.
कणकवलीमधील निकाल पुढील प्रमाणे
प्रभाग क्र. १ – कविता राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ),
प्रभाग क्र. २ – प्रतीक्षा सावंत (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ३ – अभिजित मुसळे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ४ – आबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग क्र. ५ – मेघा गांगण (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ६ – सुमेधा अंधारी (भाजप)
प्रभाग क्र. ७ – सुप्रिया समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ८ – उर्मी योगेश जाधव (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ९ – मेघा सावंत (भाजप),
प्रभाग क्र. १० – माही परुळेकर (शिवसेना),
प्रभाग क्र. ११ – विराज भोसले (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र.१२ – गणेश उर्फ बंडू हर्णे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १३ – सुशांत नाईक (शिवसेना)
प्रभाग क्र. १४ – रुपेश नार्वेकर (भाजप)
प्रभाग क्र. १५ – मानसी मुंज (शिवसेना)
प्रभाग क्र. १६ – संजय कामतेकर (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १७ – रवींद्र गायकवाड (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)