नगरपालिका निवडणूकीत भाजपाचा झेंडा
भाजपाचे ४, स्वाभिमानीचा १ तर अपक्षांचा १ नगराध्यक्ष
मुंबई : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे एकूण ६ पैकी ४ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. जामनेर नगरपरिषेच्या २४ पैकी २४ जागा भाजपने जिंकल्या आहेत. कणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने बाजी मारली आहे.जामनेर, देवरूख, वैजापूर, आजरा या ठिकाणी भाजपचे तर कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा तर गुहागरमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ६ पैकी ४ नगरपालिकांमध्ये सत्ता काबीज केली असून, एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचा तर एका ठिकाणी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे.राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणूकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. एकूण सहा पैकी चार ठिकाणी ४ ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. जामनेरमध्ये मंत्री गिरिश महाजन यांनी गड राखला आहे. २४ पैकी २४ जागा भाजपने जिंकल्या असून, नगराध्यक्षपदी साधना गिरिश महाजन या विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार अंजली उत्तम यांचा पराभव केला. महाजन यांना ८ हजार ४४१ मते मिळाली. सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने १० जागा जिंकत गड राखला, नगराध्यपदी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे समीर नलावडे विजयी झाले त्यांनी शिवसेना भाजप युतीचे संदेश पारकर यांचा केवळ ३७ मतांनी पराभव केला.या ठिकाणी भाजपला ३, शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. वैजापूर मध्ये २३ जागांपैकी भाजपला ९ , कॅांग्रेसला १ तर शिवसेनेला १३ जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी विजयी झाल्या आहेत त्यांनी शिवसेनेच्या ताशफा अजहर अली यांचा पराभव केला.
देवरूख नगरपंचायत निवडणूकीत भाजपला ७, राष्ट्रवादीला ३, कॅांग्रेसला १, शिवसेनेला ४, मनसे आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये विजयी झाल्या त्यांना २ हजार ४३५ तर शिवसेनेच्या उमेदवार धनश्री बोरूकर यांना २ हजार ३१६ मते मिळाली.गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना पराभवाचा सामना कराव लागला या ठिकाणी शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीला ९, भाजपला ६, राष्ट्रवादीला १, शिवसेनेला १ जागा जिंकता आली, नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. आजरा नगरपंचायतीत राष्ट्रवादीला ३, कॅांग्रेसला २, शिवसेनेला १, अपक्षांना २, तर ताराराणी आघाडीला ९ जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी ताराराणी ाघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाला आहे. एकूण ११५ पैकी ५७ ठिकाणी भाजपा आणि भाजपा समर्थित नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये ४८ नगरसेवक हे भाजपाच्या तिकिटावर तर ९ हे समर्थित आहेत. आजरा येथे भाजपा आणि ताराराणी यांनी ९ जागा जिंकून नगराध्यपद पटकाविले.वैजापूर, देवरूख येथेही भाजपाने अध्यक्षपद काबीज केले आहे. देवरूखमध्ये भाजपाला ७ तर वैजापूर येथे ८ जागा मिळाल्या. गुहागरमध्ये ६ जागी भाजप निवडून आली आहे.राज्यात सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुकींमध्ये भाजपाचा आलेख सतत उंचावतच राहिला असल्याचा दावा भाजपने केला आहे.