युती आमची मजबूरी नाही
मुंबई : शिवसेनेची भाजपशी युती करण्याची इच्छा नसेल तर ते आपला निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत असा शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
आगामी निवडणूकीसाठी भाजपची शिवसेनेशी युती करण्याची इच्छा आहे तर शिवसेनेने युतीची बोलणी करण्यास नकार दिला आहे . या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.जब तक चॅांद सुरज रहेंगा अशी त्यांची इच्छा असेल तर ते स्वतंत्र आहेत. युती ही बळजबरीने होवू शकत नाही. युती ही भावनेच्या आधारे होत असते ती बळजबरीने नव्हे असे सांगतानाच कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या हातात सत्ता द्यायची असेल तर त्यांनी स्वतंत्र लढावे असे सांगतानाच युती आमची मजबूरी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आगामी निवडणुकीत युती व्हावी यासाठी कोणाचाही कुणावर दबाव नाही. शिवसेनेला जर वेगळे लढायचे असेल आणि त्यांची भूमिका भाजपला सोबत घ्यायचेच नाही अशीच असेल तर आम्ही देखील वेगळे लढण्यासाठी तयार आहोत, असे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. युतीचा निर्णय भावनेवर आधारित नाही, तर तर्क व आकड्यांवर होईल, तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.