मुंबईतील भाडेकरूना पाचशे फूटांचे घर द्या
राज पुरोहित यांची मागणी
मुंबई : राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर होणार असून त्यात मुंबईत गेल्या सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ राहणा-या भाडेकरूना त्यांच्या राहत्या इमारती विकसीत करताना पाचशे फूटाच्या सदनिका देण्याची तरतूद करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अनेक महत्वाच्या मागण्या भाजपाचे विधानसभेतील प्रतोद आ. राज पुरोहीत यानी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री याना दिलेल्या निवेदनात त्यानी मुळच्या मुंबैकराना विस्थापित न करता त्याना आहेत त्याच जागी विकसीत इमारती करताना पाचशे फूटांचे घर मिळावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, अतिक्रमणे करणा-यांना देखील मुंबईत सरकारने पाचशे फूटांच्या सदनिका दिल्य आहेत. मुंबईत विकासकासोबत नागरीक जे विकासाचा करार करतात त्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात यावा जेणे करून विकासकाने फसवणूक केल्यास नागरीकांना न्याय मिळावा. तीन वर्षात विकासकाने संबंधीत जागेचा विकास नियत वेळेत पूर्ण केला नाही तर त्या इमारतींचा विकास करावा अशी मागणी त्यानी केली आहे. महारेरा मध्ये म्हाडाच्या घरांचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणीही त्यानी केली.