गृहराज्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने वाचले सामान्यांचे प्राण.!

गृहराज्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने वाचले सामान्यांचे प्राण.!

देऊळगाव राजा : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे शासकीय दौऱ्यावर असताना देऊळगाव राजा चिकली रोड येथे अचानक एका गाडीचा अपघात झाला. राज्यमंत्री पाटील यांनी गाडी थांबवून या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि अँम्ब्युलंस येण्याची वाट न पाहता स्वतःच्या ताफ्यातील गाडी उपचारासाठी उपलब्ध करून देवून सर्वसामान्यांचे प्राण वाचवले.

आज सायंकाळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे शासकीय दौऱ्यावर असताना देऊळगाव राजा चिकली रोड येथे अचानक एका गाडीचा अपघात झाला. यावेळी रस्त्यावर कोणीही थांबण्यास तयार नसताना परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ डॉ. रणजीत पाटील हे थांबून मदत करण्यास पुढे सरसावले. विचारपूस करताच त्यांना कळले की अँम्ब्युलंस येण्यास अर्ध्यातासाचा अवकाश जाणार होता. अशावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाडी उपचारासाठी उपलब्ध करून दिली आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.प्रसंगी ताफा थांबवून, स्वतः अपघातग्रस्तांना मदत करण्यास धावणारे गृहराज्यमंत्री पाटील यांच्या समाजभान तसेच संवेदनशिलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला.

Previous articleशहरी लोकांना हेवा वाटावा असा विकास  सरकारने ग्रामीण भागात केला 
Next articleमानवत आत्महत्या प्रकरणी तहसीलदारांसह संबंधितांना निलंबित करा