मुंडे बहिण भाऊ आज पुन्हा एकत्रित !

मुंडे बहिण भाऊ आज पुन्हा एकत्रित !

परळी : राज्याच्या ग्रामविकास विकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे येथिल स्थानिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पुन्हा एकाच व्यासपीठावर आले.एवढेच नव्हे तर या दोघा भाऊ बहिणींनी आपल्या भाषणात एकमेकांचा उल्लेखही केला.

दैनिक लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.त्यावेळी या भाऊ बहिणींची गळा भेट झाल्याने राज्यातील जनतेला आनंद झाला होता.त्यानंतर पुण्यात झालेल्या हल्लाबोल सभेत धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली होती तर पंकजा मुंडे यांनी स्थानिक कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला होता.त्यानंतर आज दोघे भाऊ बहिण स्थानिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते परळी शहरात आयोजित ब्राम्हण सभा आयोजित सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे.या दोघांनाही आपल्या मनोगतात एकमेकांचा उल्लेख केला हे विशेष.

Previous articleमानवत आत्महत्या प्रकरणी तहसीलदारांसह संबंधितांना निलंबित करा
Next articleउध्दव ठाकरे यांचा विरोध अनाठायी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here