आ. देशमुखांनी नसत्या उचापती करण्यापेक्षा नाणार विदर्भात नेऊन दाखवावा
मनिषा कायंदे यांची चपराक
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शवलेला विरोध अनाठायी असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार आणि विदर्भाचे स्वयंघोषित नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना प्रवक्ता प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी आशिष देशमुख यांची खरडपट्टी काढली असून, त्यांनी नसत्या उचापती करू नये त्यापेक्षा त्यांच्या विरोधाने चर्चेत आलेला नाणार प्रकल्प त्यांनी विदर्भात आणून दाखवावा आणि विकासाच्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवाव्यात अशी चपराक त्यांनी लगावली आहे
आ.आशिष देशमुख यांना भाजपमध्ये सध्या कोणी विचारत नाही त्यामुळे कदाचित स्वतःचा महत्त्व वाढवण्यासाठी ते थेट उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करत असावेत प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची आवश्यकता नाही हे सांगताना नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यापेक्षा नागपूरच्या आणि विदर्भाच्या हिताचे निर्णय शासनाने घ्यावे असे म्हटले होते. त्यासाठी नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याची गरज नाही तर मुख्यमंत्र्यांनी चांगले निर्णय घेऊन दाखवावेत आणि प्रत्यक्षात त्या निर्णयाची च अमलबजावणी करावी असेही त्यांनी म्हटले होते .
आ. देशमुखांनी नाणार प्रकल्पाला प्रत्यक्षात विदर्भात आणून दाखवाव आणि शिवसेनेच्या बाबत बोलण्यापेक्षा त्यांनी आपल्या सरकारच्या आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणांबाबत मार्गदर्शन करावे असा टोलाही त्यांनी लगावला.