विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांतुन विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली ,अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्थां मतदार संघात ही निवडणूक होत आहे.
राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) जयंत जाधव ( नाशिक ), बाबा जानी दुर्राणी ( परभणी-हिंगोली),काॅग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपाचे प्रवीण पोटे ( अमरावती ) आणि मितेश भांगडिया ( भाजप ) या सदस्यांची ( अनिल तटकरे ३१मे ) २१ जून रोजी मुदत संपत आहे. येत्या २६ एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारिख आहे. २१ मे रोजी मतदान होईल तर २४ मे रोजी मतमोजणी होईल.