उध्दव ठाकरेंच्या सभेवर नाणारवासियांचा बहिष्कार
रत्नागिरी : उद्योग खाते शिवसेनेकडे असल्याने अगोदर उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नका, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उद्या सोमवारच्या नाणार दौऱ्याला स्थानिकांनी विरोध केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नाणारला भेट देण्याचे जाहीर केले होते. मात्र उध्दव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतलेला आहे. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे.उद्योग खाते शिवसेनेकडे असल्याने प्रथम उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नका, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांच्या उद्या सोमवारी होणा-या नाणार दौऱ्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. उद्योग खात्याने नाणार संदर्भात काढलेला अध्यादेश १५ दिवसात रद्द करण्याचे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिले होते मात्र ते अद्यापही पूर्ण न झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत उद्याच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या सोमवारी स्थानिकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.