मुख्यमंत्र्यांनी राज्याची आणि देशाची दिशाभूल करू नये

मुख्यमंत्र्यांनी राज्याची आणि देशाची दिशाभूल करू नये

मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना सुभाष देसाई यांनी त्यांच्या अधिकारात रद्द केली आहे, तो त्यांचा मंत्री म्हणून अधिकार आहे, त्यावर लगेच रिफायनरी रद्द केल्याचा अविर्भाव आणून मुख्यमंत्र्यांनी लोकांना फसवू  नये, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही रिफायनरी चा प्रकल्प जाहीर केला , त्या प्रकल्पाला नाणार व्यतिरिक्त कुठेही मुख्यमंत्र्यांनी नेऊन  दाखवावे, थेट विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेऊन दाखवावा. अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता डॉ. प्रा. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करून जनतेच्या मनातील भूमिका मंडळी आहे, त्यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी लगेच आपल्या प्रतिक्रिया देऊन पोपटपंची सुरु केली, ज्यांना आपण नेमकं काय करतोय आणि नेमके आपले मुद्दे काय हेच माहित नाही त्यांनी उगाच पोपटपंची करू नये, मुद्देहीन असलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियांना आम्ही काडीची किंमत देत नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Previous articleनाणार प्रकल्पाबाबत सेना भाजपाकडून कोकणवासीयांचा विश्वासघात
Next articleनाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करणे हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here