शेतकऱ्यावर पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी

शेतकऱ्यावर पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी

मुंबई : राज्यात शेतकऱ्यावर पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ यावी ही बाब दुर्दैवी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना समान पाणी पुरवठा केला जावा अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खा.सुळे बोलत होत्या. काल वसंत पवार या शेतक-याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. इंदापूर अर्बन बँकेचे संचालक आणि शेतकरी वसंत पवार यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली.गेल्या चार वर्षांपासून राज्यात स्त्री भ्रूण हत्यामध्ये वाढ झाली असून, महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत असे नीती आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आल्याने सरकारचा कारभार कसा चालू आहे हे दिसते असेही खा.सुळे यांनी सांगितले.

Previous articleएका दिवसात २३ हजार ७०० मे.वॅ. विजेचा विक्रमी पुरवठा
Next articleचंद्रकात पाटील एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवाच !