२००१ ते २००९ मधील थकित शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २००१ ते २००९ मधील थकित खातेदारांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे –
१ ) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २००१ ते २००९ मधील थकित खातेदारांना देण्याचा निर्णय.
२ ) मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी ३९६ कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.
३ ) बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.
४ ) भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.
५ ) कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी व अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-१९६३ मध्ये सुधारणा.
६ ) राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.
७ ) यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.
८ ) वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित ५६९ कामगारांना कायम करण्याचा निर्णय.
९ ) भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय.