राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट

उध्दव ठाकरे यांची टिका

अहमदनगर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याची टिका करत, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने सुरुवातीपासून केली आहे असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केडगाव येथिल हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी उध्दव ठाकरे यांनी आर्थिक मदतही जाहीर केली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे नामर्दाची अवलाद असून, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन वार करावा. अशा गुन्हेगारांना पाठी घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.या दोन शिवसैनिकांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे. मग आरोपी कोणत्याही पक्षाचे असो त्यांना शासन झालेच पाहिजे,  छ. शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याची टिका उध्दव ठाकरे यांनी करून मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असवा अशी शिवसेनेची पहिल्या पासूनच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहिजे. आम्हाला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेलच, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Previous articleपंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा देशात झळकावले !
Next articleराज्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here