केवळ दोन महिन्यातच मिरा भाईंदर आयुक्तांची बदली

केवळ दोन महिन्यातच मिरा भाईंदर आयुक्तांची बदली

मुंबई : राज्य सरकारने आज चार सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, मिरा भाईंदरचे आयुक्त बळीराम पवार यांची केवळ दोनच महिन्यात बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारचा बदल्यांचा सिलसिला सुरूच असून, आज चार सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केवळ दोनच महिन्यापूर्वी मिरा भाईंदर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेले बळीराम पवार यांचीही आज बदली करण्यात आली आहे.त्यांची नियुक्ती महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नव्या आयुक्तांची नियुक्ती जाहीर करण्यात आली नाही. नागपूर सुधार न्यासचे  अध्यक्ष डॉ. दिपक  म्हैसेकर यांची नियुक्ती पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर करण्यात आली असून, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त हा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.किनवटचे उपजिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांची नियुक्ती जव्हार पालघरचे उपजिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली असून, दिलीप पांढरपट्टे यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleभाजपाच्या आयात उमेदवारांमुळे शिक्षक परिषदेत नाराजी
Next articleएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here