नाशिक विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी

नाशिक विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी

मुंबई : येत्या २१ मे रोजी होणा-या विधान परिषद निवडणूकीसाठी शिवसेनेने नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

२१ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली,अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.
३ मे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. २१ मे रोजी मतदान होईल, तर २४ मे रोजी मतमोजणी होईल.शिवसेनेने आज एकाच उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोकणमधून राजीव साबळे यांच्या नावाची चर्चा असली तरी अजून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.

Previous articleनाणार विदर्भात गेल्यास नागपूर अधिवेशनासाठी शिवसेना पुढाकार घेणार !
Next articleफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा