राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरेंची नियुक्ती

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरेंची नियुक्ती

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी अध्यक्ष शरद पवार यांनी नियुक्ती केली असून, त्यांच्या  निवडीचे पत्र पक्षाचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी सुनिल तटकरे आणि प्रदेश कार्यालयात पाठवले आहे.

गेली ४ वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांनी पक्षवाढीसाठी आणि पक्षाची एक चांगली ओळख निर्माण केल्याबद्दल त्याची दखल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांच्या नावाची शिफारस केल्याचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी पत्रात नमुद केले आहे.

 

ncp-

Previous articleनिवडणुक खर्च काढण्यासाठी भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली
Next articleराहूल आवारेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here