माधव भांडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा

माधव भांडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई : अखेर भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांना पक्षाने मानाचे स्थान दिले आहे. मंत्री पदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आज याबाबतचा आदेश जारी केला. भूमीसंपादन करताना संबंधितांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे याची खातरजमा करण्याचे काम ही समिती करते. या समितीचे उपाध्यक्ष म्हणून भांडारी यांना बैठकीसाठी ५०० रूपये भत्ता, निवासी दूरध्वनीसाठी दरमहा तीन हजार रूपयांची प्रतिपूर्ती, चालकासह वाहनाची सुविधा (खर्चमर्यादा वर्षाला ७२ हजार रूपये) किंवा खाजगी वाहन चालकास दरमहा १० हजार रूपये, बैठकीनिमित्त राहण्याची सोय, प्रवासभत्ता तसेच दैनिक भत्ता देय राहील.

 

Previous articleकर्नाटक निवडणूकीसाठी पंकजा मुंडे स्टार प्रचारक
Next articleजादा भाडे आकारल्यास खासगी वाहनाचा परवाना रद्द करणार