शासनाच्या मासिकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान

शासनाच्या मासिकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान

पृथ्वीराज चव्हाण यांची कारवाईची मागणी

मुंबई :   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रकाशित केलेल्या शासनाच्या इंग्रजी मासिक महाराष्ट्र अहेड मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेल्या अवमानप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.कारवाई न झाल्यास विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवू  इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत लोकराज्य हे  मासिक मराठी हिंदी गुजराती मध्ये काढले जाते तर इंग्रजी आवृत्ती महाराष्ट्र अहेड या नावाने प्रकाशित होत असून त्याचे प्रकाशनाचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे या इंग्रजी  मासिकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या   लहानपणीच्या छायाचित्राऐवजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे छायाचित्र छापण्याचा प्रताप करण्यात आला . ही गोष्ट बाबासाहेबांचा अवमान करणारी तर आहेच परंतू माजी मुख्यमंत्री देशमुख याचाही अवमान यातून झाला आहे त्यामुळे या प्रकरणी दोषी असलेल्यांवर सरकारने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी केली आहे.

या चुकीच्या छपाइला कोण जबाबदार आहे ते शोधून त्यांच्यावर सरकारने कारवाई  केली नाही तर आम्ही विधीमंडळात यावर आवाज उठवू. ते म्हणाले की सध्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात केवळ मुख्यमंत्र्याच्या प्रतिमा उजळवण्याचे खाजगी काम सुरू आहे. खाजगी कंपनीच्या मार्फत महामित्र तयार करण्यात येत होते त्यावरआम्ही सभागृहात आवाज उठविला तेंव्हा सरकारने ही योजना गुंडाळली आहे असे चव्हाण म्हणाले

Previous articleजादा भाडे आकारल्यास खासगी वाहनाचा परवाना रद्द करणार
Next articleगांधीजींच्या विचारांचे महत्व कमी करण्याचा सरकारचा घाट ?