डी. के. जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

डी. के. जैन यांची  मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई : राज्य सरकारने अखेर आज वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे आज सेवानिवृत्त होत आहेत.मुख्य सचिवपदासाठी मेधा गाडगीळ यांच्याही नावाची चर्चा होती.

मुख्य सचिव पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता होती. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेधा गाडगीळ यांच्या नावाची यापदासाठी चर्चा होती. मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आलेले डी.के जैन हे १९८३ च्या बॅचचे सनदी अधिकारी असून ते येत्या ३१ जानेवारी २०१९ ला सेवानिवृत्त होतील.

Previous articleसुप्रियाताईंच्या ट्विटमुळे माझा राजकीय भाव वाढला
Next articleइंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि युती सरकार एकाच माळेचे मणी!