पृथ्वीराज चव्हाण पुढे आमदार होतील की नाही सांगता येत नाही !
पुणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुढे आमदार होतील की नाही माहित नाही, त्यामुळे बाबांकडे विधानसभेची उमेदवारी मागून काही फायदा नाही असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी लगावला आहे.
गेली सहा टर्म पुण्याचे नगरसेवकपदी असणारे आबा बागुल यांनी उभारलेल्या विलासरावजी देशमुख तारांगणाचे उदघाटन पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचे हस्ते पार पडले. नगरसेवक बागुल आपल्या भाषणात म्हणाले की,मी सहा टर्म नगरसेवक म्हणून काम करत असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे येणा-या विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.नगरसेवक बागूल यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत पृथ्वीराज चव्हाणांकडे आमदारकीची मागणी काय करताय पृथ्वीराज बाबाच येत्या निवडणूकीत आमदार होतील का नाही सांगता येत नाही असा टोला पालकमंत्री बापट यांनी लगावला मात्र चव्हाणांना हे कदाचित खासदार होतील असे बापट यांनी सांगून फिरकी घेतली.विलासराव देशमुख हे माझे आवडते मुख्यमंत्री होते. ते सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असत असेही बापट म्हणाले.