काॅग्रेसचे आमदार अमित देशमुखांना शिवसेनेत येण्याची ऑफर !
पुणे : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांचा आवाज ऐकून शिवसेनेच्या एखाद्या कार्यक्रमात आल्याचा भास होत असून, तुमचे तिकडे काही जमले नाही, तर शिवसेनेत या अशी खुली ऑफरआज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली आज येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिली आहे.
पुण्यातील सहकारनगर येथे स्व. विलासराव देशमुख तारांगण सुरू करण्यात आले आहे.या प्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, काॅग्रेसचे आमदार अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी जोशी म्हणाले की, शिवसेनेने मला अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. त्यासाठी मला कधीच तिकीट मागण्याची वेळ आली नाही. ही पदे सांभाळताना त्या पदांना न्याय देण्याचे कामही केले. काम करताना राज्यभर दौरे करण्याची संधी मिळाली.आमदार अमित देशमुख यांचे भाषण खूप बरे वाटले. परंतु त्यांचा आवाज ऐकून हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याचे वाटले. नाही ना असल्याचे वाटले आणि ते शिवसेनेचे वाटतात, तिकडे तुमचे काही जमले नाही तर शिवसेनेत या असे सांगत जोशी सरांनी आ. अमित देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफरच दिली.