मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका !

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका !

राज ठाकरे यांचे आवाहन

वसई : मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका असे आवाहन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वसई मध्ये झालेल्या जाहीर सभेत केले. राज ठाकरे यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज वसई येथे झालेल्या जाहीर सभेने झाली.पालघर-ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथे कार्यकर्ते आणि स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. आज वसई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजपला लक्ष केले.मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी स्थानिकांनी जमिनी देऊ नका असे आवाहन करतानाच जर या प्रकल्पासाठी बळाचा वापर केला तर रूळ उखडून टाका असेही ते म्हणाले.पालघरमध्ये गुजराती पाट्या कशासाठी लागतायत असा सवाल करीत प्रकल्प येण्या आधीच नाणारमधील जमिनी गुजरातींनी विकत घेतल्या असा आरोपही त्यांनी केला.

निवडणुकांसाठी भाजपावाल्यांकडे पैसे येतात कुठून असा सवालही त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केली. आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी म्हणतात देशात आता वीज पोहोचली मग आम्ही काय आजवर अंधारात होतो का ? मोदी-शहा सांगणार तोच निर्णय मुख्यमंत्री घेणार ,देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री आहेत, ते बसवलेले मुख्यमंत्री आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous articleकाॅग्रेसचे आमदार अमित देशमुखांना शिवसेनेत येण्याची ऑफर !
Next articleआबांच्या कन्येच्या लग्नात खा.सुप्रियाताईंनी वाटल्या अक्षता !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here