भिमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
मुंबई : कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही त्यामुळे भिमा कोरेगाव प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक झाली पाहिजे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.बांद्रा येथील उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला .म्हाडा कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा मोर्चा रामदास आठवलेंच्या नेतृत्वात काढल्यानंतर त्यांच्या संविधान बंगल्यासमोर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.
अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या; कारण मी काढला आहे मोर्चा ; त्यांना काढुद्या कोणताही परचा मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोर्चा असे सांगत मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर आपण मंत्री असलो तरी मोर्चे काढणार असे रामदास आठवलेंनी जाहीर केले.राज्यात मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर आपण मोर्चे काढले आहेत.आताही केंद्रात मंत्री असलो तरी मोर्चे काढणार.हा मोर्चा सरकार विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे.संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही जे असं करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही घालवू.देशाचे संविधान अत्यंत उंचीवर आहे त्याला हात लावायला गेलेल्यांच्या मुडदे पडलेले आहेत असे सांगत भारतीय संविधान कधीही बदलले जाणार नाही मात्र याबाबत खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे असे रामदास आठवले म्हणाले.माझ्या मंत्रीपदामुळे काहींच्या पोटात दुखतोय गोळा त्यांचा माझ्या मंत्रीपदावर आहे डोळा पण माझे आवाहन आहे की समाजात मंत्रीपदे वाढविण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.दलितांवर अत्याचार होतात हे खरे असून त्याचा मुकाबला केला पाहिजे. दलित अत्याचाराचे खैरलांजी ; खर्डा ; सोनई आदी हत्याकांडाची प्रकाराणे काँग्रेस सरकार च्या काळात झाली .त्यामुळे दलित अत्याचार हा राजकीय प्रश्न नसून ती सामाजिक समस्या आहे. समाजप्रबोधनातून प्रश्न सोडविण्यासोबत दलित अत्याचाराचा मुकाबला केला पाहिजे अत्याचाऱ्यांना जेल मध्ये घातले पाहिजे असे आवाहन रामदास आठवलेंनी केले.,
एट्रॉसिटी कायद्याच्या च्या संरक्षणासाठी आपण खंबीरपणे सरकार मध्ये आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सरकार सहमत नाही .सरकार एट्रॉसिटी कायद्याच्या बाजूने आहे.त्यासाठी आरपीआय नेही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.ऍट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही. असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.मला ज्या लोकांनी पाठिंबा देऊन माझे नेतृत्व स्वीकारले त्यांनी सांगितले तर एका क्षणात मंत्रिपदाचा राजीनामा देईन मात्र ज्या लोकांचे समाजात कोणतेही योगदान नाही . मेंडीकोट खेळत बघ्याची भूमिका घेणाऱ्या रिकाम टेकड्यानी सोशल मीडियात खोटे आरोप करून राजीनामा मागितला तर अश्यांच्या मताला मी भीक घालणार नाही.सोशल मीडिया आमच्याही भीमसैनिकांना चालविता येते असा इशारा आठवलेंनी आपल्या विरोधकांना लगावला .अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदविल्यानंतर पीडित दलितांवर कलम ३९५ चा खोटे गुन्हे नोंदवू नयेत असा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी; पदोन्नती मध्ये दलित आदिवासींना आरक्षण मिळण्यासाठी संसदेत कायदा करवा; भीमकोरेगाव हल्ल्यातील साक्षीदार पूजा सकट हिची हत्या झाली असून आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी आदी मागण्या यावेळी मोर्चा तर्फे करण्यात आली










