सुरेश धस उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

सुरेश धस उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

बीड : बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे उद्या गुरूवारी आपला उमेदवारी उस्मानाबाद येथे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आहेत.

बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.), रयतक्रांती संघटना, जनस्वराज्य पार्टी या महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे उद्या गुरूवारी उस्मानाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास व भुकंप पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील निलंंगेकर यांच्यासह महायुतीचे नेते यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उस्मनाबाद-लातूर-बीड जिल्ह्यातील महायुतीमधील पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उस्मनाबाद येथे उपस्थितीत राहणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

Previous articleआत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचे दहन करा !
Next articleमराठा समाजाच्या मागण्यावर १५ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडणार