भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही !

भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही !

पंकजा मुंडे

उस्मानाबाद : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मानलेले भाऊ रमेश कराड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली आहे. रमेश कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला नाही असे स्पष्ट करतानाच भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रमेश कराड यांनी भाजपा सोडल्याने आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच सुरेश धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. तसेच धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डाववल्याने राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका सोसावा लागणार आहे. असे सांगतानाच भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.बीड-लातुर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून सुरेश धस यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ग्रामविकासमंत्री मुंडे बोलत होत्या.

Previous articleकोकणातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही !
Next articleअखेर छगन भुजबळांना जामीन मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here