अखेर छगन भुजबळांना जामीन मंजूर

अखेर छगन भुजबळांना जामीन मंजूर

मुंबई :  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दोन वर्ष तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ तुरूंगाच्या येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज सादर केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर कालच सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. भुजबळांना जामीन मंजूर झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ते तब्बल दोन वर्षे तुरूंगात होते. यापूर्वी त्यांचा जामीन अनेक वेळा विविध कारणांनी फेटाळण्यात आला होता. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मध्यंतरी रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते.सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45 (1) कलम रद्द केले आहे. या निर्णयाचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी मागणी भुजबळांनी केली होती. खंडपीठासमोर भुजबळांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात असता आपण दोन वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात आहोत, माझे वय आता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन जामीनावर सुटका करावी, अशी विनंती भुजबळांनी उच्च न्यायालयात केली होती. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तुरूंगात आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला  होता. 14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती.

 

Previous articleभविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही !
Next article९९ टक्के मराठा समाज सरकाराच्या निर्णयावर खुष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here