भुजबळांचा राष्ट्रवादीला फायदाच होईल 

भुजबळांचा राष्ट्रवादीला फायदाच होईल 

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अडचणीत असताना कारगृहात जावून त्यांची विचारपूस करणा-या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  आभार मानले आहे. राष्ट्रवादी कॅांग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेत नाही. मग आम्ही  कसा काय दबाव आणणार असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.भुजबळांना जामीन मंजूर झाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर त्यांच्याकडून दबाव आणला जाऊ शकतो, असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता.त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

खा. सुप्रिया सुळे – भुजबळांना जामीन मंजूर झाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर त्यांच्याकडून दबाव आणला जाऊ शकतो, असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता.त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत नाही. मग आम्ही  काय दबाव आणणार. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अडचणीत असताना कारगृहात जावून त्यांची विचारपूस करणा-या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  आभार मानले आहे

नवाब मलिक- जामीन मिळणे हा भुजबळांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे. आम्ही भुजबळ यांच्या संपर्कात होते. सरकारने त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार – भुजबळ यांना जामीन मिळाला याचा आनंद झाला असून, केवळ या निर्णयाला उशीर झाला त्याचीच खंत वाटते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ती व्यक्ति तुरुंगात असेल तर ते बरोबर आहे. पण कुठलाही निकाल न लागता एखाद्या व्यक्तिला काही वर्ष तुरुंगात काढावी लागतात हे अन्यायकारक आहे. अटक केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्यांचे म्हणणे मांडण्याची  संधी दिली पाहिजे असेही पवार म्हणाले. भुजबळांनी महापौर, आमदार, आणि मंत्री असताना त्यांनी जनतेच्या हिताची कामे केली असल्यामुळे  निश्चितच त्याचा फायदा पक्षाला होईल असे अजित पवार यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाकडून भुजबळांचे वाढते वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेवून पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी सक्त वसुली संचालनालय  कार्यालयात हजर राहणे,खटला सुरु असताना साक्षीदारांना प्रभावित न करणे,पासपोर्ट जमा करणे,तपास अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय मुंबईबाहेर जाऊ नये या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Previous article९९ टक्के मराठा समाज सरकाराच्या निर्णयावर खुष
Next articleभाजपने स्वतःच्या फायद्यासाठी भुजबळांना तुरूंगातुन बाहेर काढले