भंडारा गोंदिया राष्ट्रवादीला तर पालघर कॅांग्रेसला

भंडारा गोंदिया राष्ट्रवादीला तर पालघर कॅांग्रेसला

मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणुक होत असून, ही जागा कॅांग्रेसने राष्ट्रवादी कॅांग्रेसला सोडली आहे. त्यामुळे  ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर पालघरची जागा कॅांग्रेसला सोडण्यात आली आहे.

माजी खासदार नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत आज  भेट घेतली व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन्ही कॅांग्रेस एकत्र आहे याचा संदेश देण्यासाठी राष्ट्रवादीला ही  जागा सोडण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतला असून हा  निर्णय मान्य आहे. आता जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, अशी माहिती माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

Previous articleएकनाथ खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच
Next articleभुजबळ सोमवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार