वनगा ऐवजी सावरांचे निधन झाल्याचा दानवेंकडून उल्लेख
तलासरी : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या ऐवजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केल्याने मोठी गल्लत झाली ते येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते.एवढे होवूनही दानवे यांनी आपल्या भाषणात सावरा कुटुंबीय तिकडे गेले असे सांगत भाजपाचे नुकसान होणार नाही असे म्हटले.
आज येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी भाजपचे मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख केला.दानवेंनी सावरा कुटुंबीय तिकडे गेले म्हणून भाजपाचे कसलेही नुकसान होणार नाही असेही म्हटले. असे म्हणूनही त्यांना त्यांची चूक लक्षात आली नाही आणि त्यांनी आपले भाषण पुढे सुरूच ठेवले. त्यांनतर त्यांना आपली झालेली चूक लक्षात आली त्यावर त्यांनी सारवासारव केली.