शरद पवार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत

शरद पवार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत

मुंबई :  कॅांग्रेसला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्विकारणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये केले आहे.देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाचा कौल देणार असेल तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी  पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नाही. शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की, आमची मर्यादा काय आहे हे आम्हाला कळते. त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही. ही भूमिका वारंवार पक्षामार्फत स्पष्ट करण्यात आली आहे. आज ज्याप्रकारे या देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेतरी सत्ताबदल निश्चित आहे. ज्याप्रकारे निकाल येईल त्यावेळी निर्णय होणार आहे असेही  मलिक यांनी सांगितले.

Previous articleस्वार्थापोटी राजेंद्र गावीतांचा भाजपात प्रवेश
Next articleआ.पंकज भुजबळ “मातोश्रीवर”