विखेंनी घेतली भुजबळांची भेट

विखेंनी घेतली भुजबळांची भेट

मुंबई : केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांची आज विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.

जामिनावर सुटका झालेले व सध्या केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी नाशिकचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी धाव घेतली असतानाच आता राजकीय नेतेही त्यांच्या भेटीसाठी केईएम रूग्णालयात जाताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रूग्णालयात जावून भुजबळांची भेट घेतली. यावेळी विखे यांनी भुजबळांना पुष्पगुच्छ देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Previous articleआ.पंकज भुजबळ “मातोश्रीवर”
Next articleछगन भुजबळांच्या तब्बेतीची काळजी….घे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here