छगन भुजबळांच्या तब्बेतीची काळजी….घे

छगन भुजबळांच्या तब्बेतीची काळजी….घे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज यांनी आज मातोश्रीवर जावून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली , सुमारे १५ मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली त्यावेळी,उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घे असे पंकज भुजबळ यांना सांगितले. विशेष म्हणजे भुजबळ यांनीच पंकज भुजबळ यांना पेढे घेवून मातोश्रीवर धाडल्याची चर्चा आहे.

भुजबळांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले असतानाच खुद्द छगन भुजबळ यांनीच पंकज भुजबळ यांना ‘मोतश्री’वर जाण्यास सांगितल्याची माहिती समजते.उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची सुमारे १५ मिनिट भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घे असे पंकज भुजबळ यांना सांगितले.भुजबळांच्या सुटकेनंतर सामनातून भुजबळांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आता पंकज भुजबळ मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक वाढलीय का अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

Previous articleविखेंनी घेतली भुजबळांची भेट
Next articleदुधाला किमान आधारभूत दर देण्यासाठी कायदा करण्याचे विचाराधीन    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here