छगन भुजबळांना केईएममधून डिस्चार्ज

छगन भुजबळांना केईएममधून डिस्चार्ज

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ते रुग्णालयातून थेट आपल्या सांताक्रुझ येथिल निवासस्थानी रवाना झाले.

कोठडीतून सुटका होवूनही छगन भुजबळ यांना स्वादुपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.जामिनाची प्रक्रिया पूर्ण होवूनही उपचारासाठी त्यांनी केईएम मध्येच आराम घेतला. त्या दरम्यान त्याचे समर्थक आणि राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अखेर आज सकाळी भुजबळांन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ते आपल्या सांताक्रुझ येथिल निवासस्थानी रवाना झाले.

Previous articleनोटाबंदी, मांसबंदीनंतर मोदीबाबा नसबंदीही करतील : धनंजय मुंडे
Next articleछगन भुजबळांना अजून उपचाराची अथवा शस्त्रक्रियेची गरज !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here