शिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून घरोबा- भुजबळ

शिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून घरोबा- भुजबळ

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या काळजी बद्दल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मी शिवसेनेसोबत २५ वर्षे होतो त्यामुळे ऋणानुबंध असतातच असे सांगतानाच माझ्या पडत्या काळात शिवसेना दोन शब्द चांगले शब्द बोलली,याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी  डिस्चार्ज देण्यात आला.त्यानंतर ते सांताक्रुझमधील त्यांच्या घरी रवाना झाले. घरी पोहचल्यानंतर त्यांनी आपल्या कुटूंबातील व्यक्तीशी काही वेळ घालवल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सर्वात प्रथम फोन आला अशी माहिती त्यांनी दिली. प्रकृतीला आराम मिळावा म्हणून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.आपल्या तुरूंगातील दिवसांबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’.

Previous articleपरदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला ‘बालपणीचा वर्गमित्र’!…
Next articleमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी ६ कोटींचा खर्च