शिवसेनेचा  विश्वजित कदम यांना पाठिंबा

शिवसेनेचा विश्वजित कदम यांना पाठिंबा

मुंबई : कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कॅांग्रेसचे उमेदवार आणि पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक होत असून,या ठिकाणी शिवसेना उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.येथून पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे कॅांग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. पतंगराव कदम हे सहकार,सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक कर्तबगार व दिलखुलास नेते होते.राजकारण व सहकारात त्यांची भूमिका पक्षाच्या पलिकडे होती. हे सर्व पाहता पतंगराव कदम यांना श्रध्दांजली म्हणून पलूस कडेगावची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती.तसेच दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. मात्र शिवसेना विश्वजित कदम यांना संपूर्ण तसेच सक्रिय पाठिंबा जाहीर करीत आहोत अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे  यांनी जाहीर केली आहे असे प्रसिध्द पत्रक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी ६ कोटींचा खर्च
Next articleदोन्ही कॅांग्रेस एकत्र निवडणूका लढविणार