राज ठाकरेंनी दिल्या पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई : पद्मश्री आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशिर्वाद घेतले.