” इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा” विजय असो
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई : भाजप दक्षिणेत विजयी घौडदौड करीत असताना भाजप संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा करीत आहे.मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होत असताना यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही आपल्या सभामधून भाजप आणि मोदी -शहावर निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताचे आवाहनही केले होते.या पार्श्वभूमीवर आज कर्नाटक निवडणूकीच्या निकालावर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर भाजप कसे प्रत्युत्तर देणार हे महत्वाचे आहे.