भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन संशय काढून टाकावा!
उद्धव ठाकरे
मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कर्नाटक निकालावरून भाजपला टोला लगावला आहे.ईव्हीएमबाबत सर्वांच्या मनात संशय असल्याने भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन तो काढून टाकावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्नाटक निवडणूकीच्या निकालावरून आता विविध राजकीय पक्ष आपली प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपला टोला लगावला आहे. ज्या ठिकाणी पोटनिवडणूका होतात त्यामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागतो तर निवडणुकांमध्ये विजय होतो. त्यामुळे ईव्हीएम मशिनबाबत सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. या निवडणूकीत ज्यांचा विजय झाला त्याचे अभिनंदन पण जो मुख्यमंत्री होईल त्यांनी मराठी माणसाचा आदर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.