भाजपच्या एकमार्गी विजयावर विश्वास बसत नाही !

भाजपच्या एकमार्गी विजयावर विश्वास बसत नाही !

जयंत पाटील

मुंबई : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. एकंदरीत वातावरण बघितले तर काँग्रेसला चांगले वातावरण होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल असे वाटत होते. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत होता. भाजपचा एकमार्गी विजय मिळणे हे मला पटत नाही. माझा विश्वास बसत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकमध्ये ग्राऊंड लेवलला माझा जास्त परिचय नाही परंतु मला जी माहिती मिळत होती. त्यावरुन काँग्रेसची परिस्थिती चांगली होती आणि आजचे निकाल पाहिले तर एवढया मोठया प्रमाणात भाजप निवडून येणं आणि कमी प्रमाणात काँग्रेस निवडून येणं हे मिळत असलेल्या फिडबॅकशी सुसंगत नव्हते. ग्राऊंड रिअलिटीमध्ये लोकांच्या मनात होते तेच फिडबॅकमध्ये येतं परंतु मला वाटत नाही तिथल्या लोकांच्या मनात जे होतं. त्यात आणि मते पडली त्यात सुसंगती आहे अशी शंकाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleभाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन संशय काढून टाकावा!
Next articleभंडारा जिंकू “ठोकून” पालघर जिंकू “ठासून”