डेसमंड नॉर्मन रॉस येट्स विधानसभेवर नामनियुक्त

डेसमंड नॉर्मन रॉस येट्स विधानसभेवर नामनियुक्त

मुंबई : विधानभवनात आज झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल नियुक्त डेसमंड नॉर्मन रॉस येट्स यांची विधानसभेवर नामनियुक्ती झाल्याबद्दल शपथविधी झाला .

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डेसमंड येट्स यांना शपथ दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट,आमदार राज पुरोहित, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.विधानसभेत थेट सार्वत्रिक निवडणूकीद्वारे २८८ तर घटनेतील तरतुदीनुसार अॅग्लो इंडियन प्रतिनिधीची २८९ वे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार साडे तीन वर्षानंतर ही नियुक्ती करण्यात आली आली.

Previous articleकर्नाटकचा निकाल ; ही तर २०१९ मधील भाजपच्या विजयाची नांदी
Next articleराज्य शासनाच्या विविध विभागांतील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता