भाजप आमदार प्रविण दरेकर यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार

भाजप आमदार प्रविण दरेकर यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार

मुंबई : राज्य विधानसभा तसेच विधान परिषदेतील २०१५ ते २०१८ या काळातील उत्कृष्ट संसदपटूंची घोषणा करण्यात आली असून, भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांना २०१७-१८ चा उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणा-या विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, विधानपरिषदेतील भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांना २०१७-१८ चा उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आ. प्रविण दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून, सहकारसह अनेक विषयावर आ. दरेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने विधानपरिषदेत  छाप पाडली आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली.पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे. डॉ. अनिल बोंडे, सुभाष साबणे, राहुल कूल (सर्व उत्कृष्ट संसदपटू, विधानसभा), प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, धैर्यशील पाटील (सर्व उत्कृष्ट भाषण, विधानसभा), अॅड. अनिल परब, विजय गिरकर, संजय दत्त (सर्व उत्कृष्ट संसदपटू, विधान परिषद) अॅड. राहुल नार्वेकर, कपिल पाटील, प्रवीण दरेकर (सर्व उत्कृष्ट भाषण, विधान परिषद).

Previous articleअधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवास
Next articleमोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here