अन्यथा भाजपा स्वबळावर निवडणूक लढविणार
पुणे : आगामी निवडणुकांमध्ये भाजपशी युती न करता स्वबळावर निवडणूका लढण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर यापुढे युती करून एकत्र लढायचे की स्वबळावर याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा असून, युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपची नाही असे सांगून, शिवसेना एकत्र आली तर युती करून अन्यथा स्वतंत्र लढण्याचा मार्ग खुला आहे असे आव्हान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिले आहे.
राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच विचाराचे असल्याने आम्ही आगामी निवडणूका युतीने लढावाव्यात अशी माझी भूमिका आहे.युतीचा निर्णय हा शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही युतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेने युती केल्यास आम्ही एकत्रित लढू अन्यथा भाजप स्वबळावर निवडणूक लढून पुन्हा सत्तेत येईल,असा दावा त्यांनी केला.