मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगेंना उमेदवारी
मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईन आणि शिवसेनचा भगवा फडकेल असा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.
शिवाजी शेंडगे हे पेशाने शिक्षक असून गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात जुनिअर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. शिवाजी शेडगे हे महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेचे राज्य उपाध्यक्ष असून शिक्षकांच्या विविद प्रश्न व समस्यांबाबत सातत्याने लढत असतात शिक्षकांच्या पगार राष्ट्रीयकृत बँकेत १ तारखेला नियोमित व्हावेत यासाठी शिवसेना आमदारांना एकत्रित करून विधान सभेच्या पायरीवर लाक्षणिक उपोशन केले, आझाद मैदानात धरणे आंदोलन केले, कोर्टाची लढाई लढली व शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. विना अनुदानिक शाळांना २० टक्के अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी व अनुदानाची निकष पूर्ण केलेल्या शाळांना त्वरित १०० टक्के अनुदान द्यावे, २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. मातृभाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा शेवटच्या विद्यार्थी असे पर्यंत बंद करू नये, शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच व्हावे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा विविध न्याय मागण्यांबाबत शिवाजी शेंडगे यांनी शिवेसेना शिक्षकसेनेच्या माधायामातून अनेक आंदोलने ही केली आहेत.
शिक्षकांना कॅशलेस मेडीकल सुविधा मिळावी यासाठी सातत्यानी दोन वर्ष मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. सन २०१५ मध्ये शिवाजी शेंडगे यांच्या पनेलने माध्यमिक शिक्षक कर्मचारी पगारदार पतसंस्थेची निवडणूक लढवली होती आणि सर्वाधिक मते घेऊन शेंडगे यांच्यासह पनेल विजयी झाले होते. शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या पनेलचा शेंडगे यांनी त्या निवडणूकीत धुवा उडवला होता. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईन आणि शिवसेनचा भगवा फडकेल असा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.