रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा हा पुतळा २५ किलो मेणाचा वापर करून शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी  बनविला आहे. हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे. शिल्पकार  कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी  आठवले यांच्यासह पत्नी  सीमा आठवले व मुलगा जीत आठवले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleमुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगेंना उमेदवारी
Next articleमुख्यमंत्र्यांनी हातात पाटी व खोरे घेवून केले श्रमदान