जनता हिच आमची पार्टी आमच्या मध्ये येईल तो नेस्तनाबूत होईल !

जनता हिच आमची पार्टी आमच्या मध्ये येईल तो नेस्तनाबूत होईल !

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

नालासोपारा : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीवरून शिवसेना भाजपमधिल तणाव समोर येवू लागला आहे.देवेंद्र फडणवीसला फक्त लोकांच्या मनात कैद करता येते, अजून कुठेच नाही जनता हिच आमची पार्टी, आमच्या आणि त्यांच्या मध्ये जो येईल, तो नेस्तनाबूत होईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आज गालानगर, नालासोपारा येथील जाहीर सभेत शिवसेनेला दिला.

भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गालानगर, नालासोपारा येथे जाहीर सभा झाली.या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.वणगा कुटुंबियांना उमेदवारी देण्याच्या आमच्या निर्णयाचे मित्रपक्ष स्वागत करीत होते आणि दुसरीकडे कट रचले जात होते असे सांगत स्व. वणगा यांचे छायाचित्र लावण्याचा आम्हालाच अधिकार आहे. चिंतामण वणगा ही केवळ व्यक्ती नाही, तो आमचा विचार असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
देवेंद्र फडणवीसला फक्त लोकांच्या मनात कैद करता येते, अजून कुठेच नाही. जनता हिच आमची पार्टी, आमच्या आणि त्यांच्या मध्ये जो येईल, तो नेस्तनाबूत होईल अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

धमक्यांना घाबरू नका, निर्भयपणे मतदान करा. हे राज्य शिवछत्रपतींच्या मावळ्यांचे आहे असे मतदारांना आवाहन करतानाच भगव्या झेंड्याचा अपमान करू नका, त्याच्याआड खंडणीखोरी होता कामा नये, राजकारण करायचे असेल, तर समाजासाठी करा असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.ही गल्लीची निवडणूक नाही, तर दिल्लीची आहे. ज्यांना आपले अस्तित्व माहिती नाही, त्यांना कशाला साथ द्यायची?चिंतामण वणगा यांच्यासारखेच संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र गावित, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि त्यांना मोदीजींच्या टीममध्ये पाठवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Previous articleनिवडणूकीच्या तोंडावर मिलिंद नार्वेकरांनी घेतली भुजबळांची भेट !
Next articleबीड नगरपालिकेच्या ‘त्या’ अकरा अपात्र नगरसेवकांना मतदान करता येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here