”घशात हात” घालून सत्ता बाहेर काढली
राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
मुंबई : कर्नाटकातील राजकारणावर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.घशात हात घालून सत्ता बाहेर काढली”, अशा मथळ्याखाली व्यंगचित्र काढून आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणूका आणि सत्तेसाठी वाटेल ते करणा-या भाजपावर राज ठाकरे यांनी टीका करणारे व्यंगचित्र आज आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. ‘घशात हात घालून सत्ता बाहेर काढली”, असा मथळा असलेल्या या व्यंगचित्रात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या घशात घातला असल्याचे रेखाटले आहे. शाह हे जमिनीवर बसलेले दाखवले आहे तर शेजारी जनता दलाचे नेते भावी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उभे असलेले दाखवले आहे.










