फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका-उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका-उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून, शिवसेना पक्ष प्रमुख यांची जाहीर सभा आज नालासोपारा येथील वसंत नगरी मैदानावर पार पडली.या सभेत त्यांनी भाजपचा समाचार घेतला. येत्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक येणार आहेत. त्यामुळे हिंम्मत असेल तर मर्दासारखे लढा. फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका, असा टोला त्यांनी यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नालासोपारा येथील वसंत नगरी मैदानावर विराट सभा झाली.या सभेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला.येत्या ‘वर्षभरात निवडणूक येणार असल्याने हिम्मत असेल तर मर्दासारखे लढा. फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला श्रीनिवास वनगा यांचा विरोध असल्यामुळेच भाजला श्रीनिवास वनगा नको होता असेही उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने जर श्रीनिवासला वनगा यांना उमेदवारी दिली असती तर याच व्यासपीठावरून भाजपचा प्रचार केला असता, असेही ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात योगी आदिनाथ यांचाही समाचार घेतला. जो स्वत:च लोकसभा मतदार संघ राखू शकत नाही तो मुख्यमंत्री येथे येऊन मार्गदर्शन करत आहे. असा टोला ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिकास्त्र सोडले. मोदी यांनी देश बढ रहा है म्हटले होते याचा धागा पकडत कधी तरी आमच्या देशात या असा टोला हाणला.जे लोक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विसरले, ते वनगा यांना काय न्याय देणार, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Previous articleबीड उस्मानाबाद लातूरची मतमोजणी पुढे ढकलली
Next articleपाठीत वार करणाऱ्यांना धडा शिकवा : योगी आदित्यनाथ